राज्यावर पावणेसात लाख कोटींचं कर्ज; प्रत्येकाच्या डोक्यावर 54 हजारांचा भार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/Loan.jpg)
मुंबई | मुख्यमंत्री होताच उध्दव ठाकरे यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रिका काढण्याचं जाहिर केलंय. राज्यावर 6 लाख 80 हजार कोटी रुपयांचं कर्ज असल्याचं नुतन मंत्री जाहीर करु लागलेत. एका मराठी वृत्तवाहिनीच्या टिमनं सुत्र आणि वित्तीय संस्थांच्या अभ्यासातून आलेल्या माहितीच्या आधारावर महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीचा लेखाजोखा मांडलाय. हा प्रत्येक विचारी माणसाला चिंतेत टाकणारा आहे.
महाराष्ट्राची लोकसंख्या साडेबारा कोटी मानली तर प्रत्येक मराठी माणसांवर 54 हजार 400 रुपये एवढ्या कर्जाचा बोजा आहे. प्रत्येक मराठीजणांवर 54 हजार 400 रुपयांच्या कर्जाचा बोजा आहे. हे कर्ज हळूहळू वाढत गेलंय. गोपिनाथ मुंडे-नारायण राणे यांचं सरकार 1995 साली पाय उतार झालं. तेव्हा राज्यावर 40 हजार कोटींचा बोजा होता. आघाडीच्या 15 वर्षात आणि देवेंद्रे फडणवीस यांच्या 5 वर्षात महाराष्ट्रावरचा बोजा आणखी वाढला. एका मराठी वृत्तवाहिनीच्या टिमनं 15 व्या वित्त आयोगाचा अहवाल आणि 2017-18 च्या आर्थिक सर्व्हेक्षणाच्या नोंदी तापसल्या. 2017-18च्या आर्थिक सर्वेक्षणात एकुण 36 जिल्ह्यांपैकी 16 जिल्ह्यांचे दरडोई उत्पन्न देशाच्या सरासरी दरडोई उत्पन्नापेक्षा कमी आहे. सगळे मागास जिल्हे विदर्भ आणि मराठवाड्यातले आहेत.