breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

राज्यात ३५ कोटींचे उद्योग येणार, तरुणांना रोजगार मिळणार!

मुंबई – तब्बल ३४ हजार ८५० काेटींच्या गुंतवणुकीसह २३ हजार १८४ जणांना रोजगार देण्याची क्षमता असलेल्या उद्योगांची उभारणी महाराष्ट्रात होणार असून त्यासाठीच्या सामंजस्य करारांवर काल (२ नोव्हेंबर) स्वाक्षरी करण्यात आल्या. मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यात एक लाख कोटींची गुंतवणूक करण्याचे लक्ष्य पूर्ण करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात सरकारने १६ हजार काेटींच्या गुंतवणुकीचे करार केले होते. त्यातील ६० टक्के उद्योगांच्या जमीन अधिग्रहणासारख्या महत्त्वाच्या प्रक्रिया पूर्ण झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. केमिकल, डेटा यासह लॉजिस्टिक, मॅन्युफॅक्चरिंग अशा क्षेत्रातील उद्योग राज्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. महाराष्ट्र हा डेटा सेंटरच्या बाबतीतही देशाचे महत्वाचे केंद्र बनेल असा विश्वास मुख्यमंत्र्यानी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात राज्य गुंतवणुकीचे लक्ष्य सहज साध्य करेल असा विश्वासही देसाई यांनी व्यक्त केला. यावेळी मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, प्रधान सचिव भूषण गगराणी, वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी.अनबलगन आणि गुंतवणूकदार उपस्थित होते.

कोणत्या कंपन्या करणार गुंतवणूक?

मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडिया प्रा. लि. जपान

ब्राईट सिनो होल्डिंग प्रा. लि. भारत

ओरिएंटल एॅरोमॅटिक्स प्रा. लि. भारत

मालपानी वेअरहाऊसिंग पार्क भारत

एव्हरमिंट लॉजिस्टिक्स भारत

पारिबा लॉजिस्टिक्स पार्क भारत

ईश्वर लॉजिस्टिक्स पार्क भारत

नेट मॅजिक आयटी सर्व्हिसेस भारत

अदानी एन्टरप्राइजेस लि. भारत

मंत्र डेटा सेंटर स्पेन

एसटीटी ग्लोबल डेटा सेंटर्स भारत

कोल्ट डेटा सेंटर्स इंग्लंड

प्रिन्स्टन डिजिटल ग्रुप सिंगापूर

नेस्क्ट्रा भारत

इएसआर इंडिया सिंगापूर

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button