राज्यातील काही नेत्यांना वीज बिल आलेच नाही
![There will be 36 hours power supply in the area](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/2019_1large_Mahavitaran_2_266.jpg)
मुंबई – राज्यात या कठीण काळात सर्वसामान्यांची वीजबिले हजारांच्या घरात येत आहेत. तिथे राज्यातील १५ मंत्र्यांना गेल्या ४ ते ५ महिन्यांची वीजबिलं दिली गेली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकारातून ही बाब समोर आली आहे. एकीकडे सामान्य लोकं बील भरून मेटाकुटीला आले आहेत मात्र नेत्यांना बील आलेच नाही ही धक्कादायक बाब आहे.
गेल्या काही महिन्यात आलेली वीजबिल भरताना सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आले होते. आधीच लॉकडाऊनमुळे हाताला काम नाही, त्यात भलमोठं विजेचं बिलं पाहून सर्वसामान्यांच्या संकटात भर पडली होती. अनेक सेलिब्रिटींनी, नेत्यांनी सोशल मीडियावर याबाबत चिंता व्यक्त केली होती. मात्र याचा सर्वाधिक फटका सामान्य नागरिकांना बसला.
आरटीआयमधून आलेल्या बातमीनंतर याच सर्वसामान्य नागरिकांनी राग व्यक्त केला आहे. बड्या मंत्र्यांना विजेचं बिल का पाठविण्यात आलं नाही? असा सवाल उपस्थित केला आहे.RTI कार्यकर्ता अनिल गलगली यांनी लोक निर्माण विभागाकडून मार्च, एप्रिल, मे, जून आणि जुलैमध्ये राज्यातील मंत्र्यांच्या बंगल्याच्या वीजबिलाबाबत माहिती विचारली आहे.