राज्याच्या पोलीस महासंचालकपदी वरिष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे
पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदी नियुक्ती
अधिकारी नागराळे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार
मुंबई | प्रतिनिधी
पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार वरिष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्याबाबतचा आदेश राज्य गृह विभागानं आज काढला आहे.
हेमंत नगराळे हे सध्या न्यायिक व तांत्रिक विभागात महासंचालक म्हणून कार्यरत होते. सुबोध कुमार जायस्वाल यांना राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरून कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यानंतर महासंचालक पदाचा अतिरिक्त पदभार हेमंत नगराळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. नगराळे हे सन 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. गेल्या काही दिवसांपासुन नगराळे यांच्यासह सुरेंद्र कुमार पांडे आणि रजनीश शेठ यांची नावे महासंचालक पदासाठी चर्चेत होती. अखेर आज गृह विभागाने पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार हेमंत नगराळे यांच्याकडे सोपविला आहे.