breaking-newsमुंबई

राज्याचा अर्थसंकल्प ६ मार्चला

  • सावरकरांवरील ठरावावरून शिवसेना-भाजपमध्ये वाद

मुंबई | महाईन्यूज

सुमारे महिनाभर चालणारे राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २४ फेब्रुवारीपासून सुरू होत असून, राज्याचा अर्थसंकल्प ६ मार्चला सादर केला जाईल. अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे असून, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची शिफारस करणारा ठराव मांडावा, अशी मागणी भाजपच्या वतीने कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आली असता शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली आहे.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील कामकाज ठरवण्यासाठी कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानभवनात सोमवारी पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, संसदीय कामकाजमंत्री अनिल परब, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदामंत्री जयंत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, आशीष शेलार आदी यावेळी उपस्थित होते.

या बैठकीत २४ फेब्रुवारी ते २० मार्च या काळासाठी विधिमंडळाच्या कामकाजाचे तपशील ठरवण्यात आले. या अधिवेशनात शाळांना मराठी भाषा सक्तीचा कायदा मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला.  २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिन असल्याचे औचित्य साधून तो मंजूर करण्यात येईल. त्याचबरोबर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचा ठराव विधानसभा आणि विधान परिषदेत मंजूर करण्यात येईल, असा निर्णय या बैठकीत झाला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button