breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
राज्यभर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची सरकारविरोधात निदर्शने
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज ईडी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. याप्रकरणी ईडीने शरद पवार, अजित पवार यांच्यासह ६० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ईडीकडून कोणतीही नोटीस पाठवण्यात आली नसताना देखील शरद पवार ईडी कार्यालयात जाणार आहेत. त्यामुळे ईडी कार्यालय परिसरासह दक्षिण मुंबईतील कफ परेड, मरिन ड्राईव्ह, आझाद मैदान, डोंगरी, जे. जे मार्ग, एम आर ए मार्ग पोलिस स्टेशन परिसरामध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे.