breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला अभिनेत्री कंगना राणावत!

मुंबई । प्रतिनिधी

अभिनेत्री कंगना राणावत आणि सरकारमध्ये सुरू असलेल्या राजकीय संघर्षाला आता वेगळं वळण मिळाल्याचे दिसत आहे. कंगना राणावत तिच्या बहिणीसोबत राज्यपाल भगतसिंह कोशयारी यांच्या भेटीला गेली आहे.

महाराष्ट्र पोलीस आणि मुंबईला पाक व्याप्त काश्मीरीशी तुलना केल्याने कंगना रनौत आणि महाराष्ट्र सरकारमध्ये कलगीतुरा रंगला आहे. बीएमसिने कंगनाच्या कार्यलयावर केलेल्या कारवाई विरोधात कंगना चांगलीच संतापल्याचे पाहायला मिळाले . मुंबईत दाखल होताचं कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. कंगनाचा अद्यापही सरकारवर टीकेचा भडीमार सुरू असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान कंगना आणि सरकारमध्ये रंगलेल्या या राजकीय नाट्याच्या पर्शवभूमीवर आज कंगनाने राज्यपालांची भेट घेतली आहे. त्यामुळे कंगना राजपालांकडे काय भूमिका मांडणार याकडे लक्ष लागून आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button