Breaking-newsमुंबई
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/images-2.jpg)
मुंबई : ‘सामना’च्या संपादक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना पितृशोक झाला. रश्मी ठाकरे यांचे वडील आणि उद्धव ठाकरे यांचे सासरे माधव गोविंद पाटणकर यांचे काल (15 जून) मुंबईत निधन झाले. पाटणकर आणि ठाकरे कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कला नगर येथे दाखल झाले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून ठाकरे आणि पाटणकर कुटुंबाच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आज राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वनपर भेट घेतली