breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

रविवारी मुंबईत मागील 5 वर्षातील रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद…

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाचा चांगलाच जोर पकडला आहे. त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना या पावसामुळे नक्कीच दिलासा मिळाला आहे . जूनमध्ये नसला तरी जुलैच्या पहिल्या आठवड्यात या महिन्यातील अपेक्षित पाऊस पडला आहे. यात पहिल्या 6 दिवसांत 60% पाऊस झाला आहे. रविवारी मुंबईत मागील पाच वर्षातील रेकॉर्ड ब्रेकिंग पावसाची नोंद झाली होती. केवळ मुंबईच नव्हे तर ठाणे आणि रायगड जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पासून मागेल काही दिवस कायम आहे. 506.4mm इतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

मुंबईत जुलै महिन्यात 840.7mm इतका पाऊस पडणे अपेक्षित आहे. मात्र सोमवारी म्हणजे 6 जुलै संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मुंबईत जवळपास 506.4 mm इतका पाऊस नोंदवण्यात आला. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र, औरंगाबाद, मराठवाडा, विदर्भ, पुणे शहरात अद्याप जोरदार असा पाऊस झालेला नाही मात्र पावसाची सद्य स्थिती सुद्धा समाधानकारक आहे. यंदा सरासरीच्या 100 टक्के पाऊस होणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, आज, मंगळवारी 7 जुलै रोजी मुंबई सह उपनगरात तसेच ठाणे , रायगड , नवी मुंबई येथे अधून मधून पावसाच्या सरी बरसतील. आज पाऊस सलग राहणार नाही पण कोसळायला लागला की मध्यम ते जोरदार स्वरूपात असेल. पुढील 24 तासांसाठी मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर तसेच उपनगरीय भागात सुद्धा ढगाळ वातावरण असणार आहे .

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button