breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

‘यूटय़ूब’वरील प्रात्यक्षिकांवरून २२ बंदुकांची निर्मिती

नवी मुंबई | महाईन्यूज

‘यूटय़ूब’वरील प्रात्यक्षिके पाहून १२ बोअरची रायफल तयार करून विकणाऱ्या दोघांना नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. या वेळी त्यांच्याकडून १० बंदुका आणि दोन काडतुसे आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. परशुराम पिरकड आणि दत्ताराम पंडित अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. यातील परशुराम हा सुतारकाम करतो तर दत्ताराम हा विद्युत उपकरणांच्या दुरुस्तीचे काम करतो.

दोघांची घट्ट मैत्री झाल्यानंतर त्यांनी पैसे कमावण्याचा नामी मार्ग शोधून काढला. सुतारकाम करता करता परशुराम हा बंदूक दुरुस्तीचे काम करीत होता, मात्र त्याच्याकडे याचा परवाना नव्हता, मात्र दोघांनी बंदुका तयार करून विकण्याची शक्कल लढवली. त्यानंतर दोघांनी मिळून बंदुका तयार करण्यासाठी ‘यूटय़ूब’वर ‘अपलोड’ करण्यात आलेल्या काही चित्रफिती पाहण्याचा सपाटा लावला. नंतर त्यांनी त्याबाबतची भरपूर माहिती मिळवली आहे. याच वेळी परशुराम याच्याकडे दुरुस्तीसाठी काही बंदुका येत होत्या. त्यातून त्याने काही साहित्य मिळविले आणि त्यातून त्याने बंदुका तयार करण्याचा निर्णय घेतला. यातून त्यांनी ‘१२ बोअर’च्या दहा बंदुका तयार केल्या.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button