breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराष्ट्रिय

…म्हणून उद्धव ठाकरेंचा २४ नोव्हेंबरचा अयोध्या दौरा रद्द

मुंबई| महाईन्यूज

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा २४ नोव्हेंबरचा नियोजित अयोध्या दौरा रद्द करण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणांनी उद्धव यांच्या दौऱ्याला सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी नाकारल्याने हा दौरा रद्द करण्यात आल्याचे पक्षाच्या प्रवक्त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले आहे. असं असलं तरी राज्यामधील सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसल्याचे हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे.

मात्र आता उद्धव अयोध्येला कधी जाणार आहेत यासंदर्भातील तारीख पक्षाने जाहीर केलेली नाही. मागील वर्षीही ठाकरे कुटुंबीय २४ नोव्हेंबरलाच अयोध्या दौऱ्यावर गेले होते. यंदा राज्यातील राजकीय परिस्थिती स्थिर नसल्याने उद्धव यांनी नियोजित दौरा पुढे ढकलला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button