breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
मोदींनी आपल्या आईच्या जन्माचा दाखला आणावा – अबू आजमींची खळबळजनक टीका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/8-11.jpg)
मुंबई |महाईन्यूज|
इतरांची जन्मप्रमाणपत्र मागविण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आईच्या जन्माचा दाखला आणावा, असे संतापजनक वक्तव्य आमदार अबू आजमींनी केले आहे. मुंब्र्यातील शाहीन बाग येथील जनआंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी हे विधान केलं आहे.
नागरिकत्व संशोधन कायद्यावरुन सध्या देशभरात वादंग सुरू असताना विविध नेत्यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. समाजवादी पार्टीचे नेते अबू आजमी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जहरी टीका केली आहे.
तसेच जेव्हा मुस्लिम समाज देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होते, तेव्हा मोदी-शहांची माणसे इंग्रजांशी संधान बांधून आपल्याच देशबांधवांच्या विरोधात कारवाया करत होते असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.