breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मेट्रोची ट्रेन कोसळून एका महिलेचा जागीच मृत्यू, क्रेनचेही दोन तुकडे

मुंबई – अंधेरी पश्चिम दृतगती महामार्गावर मेट्रो क्रेन कोसळून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून तिघेजण जखमी आहेत. तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही मेट्रो क्रेन अंधेरी वेस्टर्न हायववेवरून जोगेश्वरीहून वांद्रेला घेऊन जात होते. मात्र, दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला. आज पहाटे सहा वाजताच हा अपघात झाला असून क्रेनचे दोन तुकडे झाले आहेत

चालकाचे क्रेनवर नियंत्रण सुटल्याने ती क्रेन मेट्रोच्या पिलरला जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की त्या क्रेनचे दोन तुकडे झाले. अंधेरीतील गुंदावली बस स्टॉपजवळ हा अपघात झाला. यावेळी बस स्टॉपवर बस पकडण्यासाठी उभ्या असलेल्या एका महिलेच्या अंगावर त्या क्रेनचा एक भाग कोसळला. त्यामुळे त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. फाल्गुनी पटेल असे या मृत महिलेचे नाव सांगितले जात आहे. या महिलेसोबत बस स्टॉपवर उभे असलेले इतर दोन व्यक्तीही जखमी झाले आहे. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान या दुर्घटनेनंतर क्रेनच्या चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला आहे. सध्या घटनास्थळी पोलीस चौकशी करत आहेत. तसेच या चालकाविरुद्ध इतर कारवाईचे आदेश नेण्यात आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button