breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुख्यमंत्र्यांकडून हॉटेल्स सुरु करण्याचे संकेत, कर्मचाऱ्यांनी आकाशात उडत कामावर यायचं का? संदीप देशपांडेंचा टोला

मुंबई | राज्यात लवकरच अनलॉक 5 ची घोषणा करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील रेस्टॉरंट पुन्हा सुरु करण्याचे संकेत दिले आहे. राज्यातील रेस्टॉरंट पुन्हा सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत. ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. यावरुन मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

“अनलॉक 5 सुरू होणार आहे, मुख्यमंत्र्यांनी हॉटेल्स सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाहतूक व्यवस्था काय? असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. कर्मचाऱ्यांनी आकाशात उडत कामावर यायचं का?” असा टोलाही संदीप देशपांडेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

मुख्यमंत्र्यांनी मुंबई-पुण्यासह औरंगाबाद, नागपूरमधील रेस्टॉरंट व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. कोरोनाच्या संकट काळात हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायिक शासनासोबत असल्याचं समाधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. अवघा महाराष्ट्र माझे कुटुंब आहे, त्यात हॉटेल-रेस्टॉरंट व्यावसायिकही आलेच. जशी माझी जबाबदारी इतरांप्रमाणे तुमच्याप्रती आहे, तशीच तुमची जबाबदारी ही तुमच्या ग्राहकांसाठी आणि तुमच्या रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button