मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला रवाना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Udhav-Thakare-3.jpg)
मुंबई | मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा हा पहिलाच अयोध्या दौरा आहे. आज सहकुटुंब ते रामजन्मभूमीचं दर्शन घेणार आहेत. मात्र, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर, शरयू आरतीचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे. दरम्यान आज सकाळी नऊ वाजाता उद्धव ठाकरे मुंबईतून निघतील. आणि ११ वाजता लखनऊला पोहोचतील.
याअगोदर नोव्हेंबर २०१८ मध्ये राममंदिराचा निकाल येण्याआधी उद्धव ठाकरेंनी अयोध्येचा दौरा केला होता. मुंख्यमंत्री सायंकाळी ४ वाजता रामाचे दर्शन घेणार आहेत. अयोध्येतील पहिल्या दौऱ्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी पुन्हा येईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.
त्यामुळे हा दौरा त्यांच्यासाठी अत्यंत खास असणार आहे. याअगोदर नोव्हेंबर २०१८ मध्ये राममंदिराचा निकाल येण्याआधी उद्धव ठाकरेंनी अयोध्येचा दौरा केला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच अयोध्येला जात आहेत. महाविकासआघाडी सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्याचं औचित्य साधत उद्धव ठाकरेंचा हा दौरा आयोजित करण्यात आलाय.