breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्यात येणार

CSMT स्थानकाचं नाव बदलण्यात आलं होत, एल्फिंस्टन स्थानकाचं नाव बदलून प्रभादेवी करण्यात आलं त्याचप्रमाणे आता मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्यात येणार आहे. या रेल्वे स्थानकाला नाना शंकरशेठ यांचे नाव देण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. 

यापूर्वी शिवसेनेनं या स्थानकाचं नाव बदलण्याची मागणी केली होती.  नाना शंकरशेठ टर्मिनस असं या स्थानकाचं नाव ठेवण्यात येईल. नाव बदलण्याचा प्रस्ताव केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्याचा निर्णय मंत्रीमंडळानं घेतला आहे. केंद्र सरकारच्या मान्यतेनंतर मुंबई सेंट्रलचं नाव बदलण्यात येईल. 

मुंबई ते ठाणे ही भारतातील पहिली रेल्वे सुरु करताना नाना शंकरशेठ यांनी मोठे योगदान दिले होते त्यामुळे  मुंबई सेंट्रल स्थानकास त्यांचे नाव देण्याची मागणी  गेल्या काही काळापासून होत होती. यापूर्वी पश्चिम रेल्वे मार्गावरील  एल्फिंस्टन स्थानकाचं नाव बदलून प्रभादेवी करण्यात आलं होतं. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button