Breaking-newsमुंबई
मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/Bmc-shivsena-vs-bjp_.jpg)
मुंबई – विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत सत्तेत असलेल्या शिवसेना आणि भाजपामध्ये मुख्य लढत आहे. मुंबई पदवीधर आणि शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक या विधान परिषदेच्या चार जागांसाठी सोमवारी मतदान घेण्यात आले होते. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेनेचे विलास पोतनीस, भाजपचे अमित मेहता, कॉंग्रेस-राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले शेकापचे ऍड. राजेंद्र कोरडे, डॉ. दीपक पवार, जालिंदर सरोदे यांच्यासह 12 उमेदवार तर मुंबई शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदार कपिल पाटील, भाजपचे अनिल देशमुख, शिवसेनेचे शिवाजी शेंडगे आहेत.