breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
मुंबई, ठाण्यासह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच पावसाचा जोरही कायम आहे. मुंबई, ठाण्यात मागील २४ तासांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला, तर पश्चिम उपनगरात भाईंदर आणि मीरा रोड भागात मुसळधार पाऊस कोसळला. त्यातच आता पुढील २४ तासांत मुंबई आणि परिसरात हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर पुढील दोन दिवस मुंबई, ठाणे आणि कोकणात जोरदार पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.
दरम्यान, जोरदार पावसामुळे राज्यातल्या अनेक नद्यांना पूर आला आहे. त्यात आता सोमवारी आणि मंगळवारी मुंबई, ठाण्यासह कोकणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.