मुंबई आणि मालेगावात तैनात असलेल्या 25 CRPF जवानांना कोरोनाची लागण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/coronavirus.jpg)
नाशिक | कोरोनाचा राज्यातील आकडा दिवसेंदिवस वेगानं वाढत आहे. मुंबई, पुण्यापाठोपाठ आता मालेगावही कोरोनाचं हॉटस्पॉट होत चाललं आहे. कोरोनाविरोधात लढणारे पोलीसच व्हायरसच्या विळख्यात सापडल्यानं खळबळ उडाली आहे. पोलीस दलातील 42 जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
23 मार्चपासून पोलीस यंत्रणा मालेगावात लॉकडाऊन आणि कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तैनात होते. मालेगावत जवळपास दीड हजारहून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. काही दिवसांपूर्वी एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. धक्कादायक बाब म्हणजे 24 CRPF तर 18 पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे. गेल्या 24 तासांत 82 प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.
मालेगावने पाहिलेली ही सर्वात मोठी एक दिवसाची वाढ आहे. त्यामुळे मालेगावमध्ये नागरिकांची चिंता वाढली आहे. मालेगावमधील एकूण रुग्णांची संख्या सध्या 258 आहे. त्यापैकी 42 पोलिसांची चाचणी गेल्या 48 तासांत पॉझिटिव्ह आली आहे.