मुंबईत 1,090, पुण्यात 745 नवे रुग्ण! महाराष्ट्राने 16 लाखांचा टप्पा ओलांडला
![# Covid-19: Worrying! Even after vaccination, many suffer from coronary heart disease](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/corona_positive-2.jpg)
मुंबई – देशभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रातील रुग्णसंख्या दिवसागणिक झपाट्याने वाढतेय. मंगळवारी आढळलेल्या 8 हजार 151 नव्या रुग्णांसह राज्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 16 लाख 09 हजार 516 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात 213 कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावल्याने कोरोनाबळींचा आकडा 42 हजार 453 इतका झाला आहे. तसेच एका दिवसात 7 हजार 429 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने राज्यात आतापर्यंत एकूण 13 लाख 92 हजार 308 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 1 लाख 74 हजार 265 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत मंगळवारी कोरोनाचे 1 हजार 090 नवे रुग्ण आढळले, तर 45 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2 लाख 44 हजार 262 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 9 हजार 821 इतका झाला आहे. तसेच मुंबईत आतापर्यंत 2 लाख 14 हजार 262 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर सध्या 18 हजार 444 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
त्याचबरोबर दररोज 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात काही दिवसांपासून दिवसभरातील नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात पुण्यात 745 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 36 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 15 हजार 756 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 7 हजार 524 इतका झाला आहे. तसेच काल आढळलेल्या 745 रुग्णांपैकी 328 रुग्ण हे पुणे शहरातील असून 193 रुग्ण पिंपरी-चिंचवड येथील आहेत. त्यामुळे आता पुणे शहरातील कोरोना रुग्णसंख्या 1 लाख 57 हजार 959 वर पोहोचली असून पिंपरी-चिंचवडमधील रुग्णसंख्या 85 हजार 870 इतकी झाली आहे.