breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत सेवा देण्यासाठी आलेल्या सांगलीतील १०६ एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

मुंबई – एकीकडे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांमध्ये घट होत असताना मुंबई आणि सांगलीसाठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. सांगलीहून मुंबईत आलेल्या १०६ कर्माचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाची चिंता वाढली आहे. मुंबईत सेवा दिल्यानंतर हे कर्मचारी सांगलीला परतले होते. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांची चाचणी करण्यात आली होती. मात्र, या सर्वांची चाचणी पॉझिटीव्ह आली.

लॉकडाउनमध्ये बंद असलेली एसटी सेवा राज्य सरकारकडून पूर्ववत करण्यात आली आहे. राज्य सरकारने अनलॉक प्रक्रियेत जिल्ह्यांतर्गत एसटी सेवा सुरु करण्यासाठी मुभा दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये नऊ डेपोंमधील चालक आणि वाहकांचा समावेश आहे. मुंबईत लोकल सेवा बंद असल्याने संपूर्ण ताण बेस्टवर पडत होता. यासाठी राज्यातील मुख्य बस डेपोंमधून बसेस मागवण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक एसटी कर्मचारी मुंबईत सेवा देत होते. सेवेचा कालावधी संपल्यानंतर कर्मचारी पुन्हा आपल्या जिल्ह्यात परतले असता त्यांची चाचणी करण्यात आली. यावेळी त्यांना करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं.

मुंबईत सेवा देण्यासाठी एकूण २०० चालक, वाहक आणि २५ अन्य कर्मचारी गेले होते. बेस्टला मदत करण्यासाठी या सर्वांनी हजेरी लावली होती. यामध्ये नऊ डेपोतील कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button