breaking-newsमुंबई

मुंबईत ‘कोसळ’धार, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकल्सचा वेग मंदावला

मुंबईत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. पश्चिम रेल्वे मार्ग, मध्य रेल्वे मार्ग आणि हार्बर रेल्वे मार्ग अशा तिन्ही मार्गांवरची लोकल वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू आहे. मुंबईतल्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साठण्यास सुरूवात झाली आहे. रविवारी दुपारी काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने रात्रीपासून दमदार बॅटिंग सुरू केली आहे. त्याचा परिणाम मुंबईच्या लोकल वाहतुकीवर झाला आहे.

हिंदमाता, किंग्ज सर्कल, अंधेरी या भागांमध्ये पाणी साठण्यास सुरूवात झाली आहे. दादर, परळ परिसरातही शाळकरी मुलांना पावसातून आणि साठलेल्या पाण्यातून वाट काढावी लागली. तसंच ऑफिसला पोहचणाऱ्या चाकरमान्यांनाही चांगलाच उशीर होतो आहे. वांद्रे येथील एस. व्ही रोड भागातही पाणी साठण्यास सुरूवात झाली आहे. घाटकोपर ते कुर्ला या स्थानकांदरम्यान लोकल्स सुमारे २० मिनिटे थांबत आहेत.

मरीन लाइन्स स्थानकात ओव्हरहेड वायर तुटल्याने चर्चगेट ते मरिन लाईन्स वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर  चर्नी रोड भागात एक ट्रेन बंद पडल्याने जलद लोकल्सची वाहतूक धीम्या मार्गावरून वळवण्यात आली आहे.

नवी मुंबईतही चांगलाच पाऊस पडतो आहे त्या ठिकाणीही काही भागांमध्ये पाणी साठण्यास सुरूवात झाली आहे. कुर्ला ते सायन दरम्यान रूळांवर पाणी साठलं आहे असंही समजतं आहे. नवी मुंबईतील वाशी, पनवेल, खारघर भागात चांगलाच पाऊस पडतो आहे. या ठिकाणही पाणी साठण्यास सुरूवात झाली आहे.

View image on TwitterView image on TwitterView image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Mumbai: Railway tracks submerged between Sion railway station and Matunga railway station following heavy rainfall in parts of Maharashtra.

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Mumbai: Streets outside Matunga Police Station water-logged, following heavy rainfall. #Maharashtra

मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरात चांगलाच पाऊस सुरू आहे. एवढंच नाही तर दक्षिण मुंबईतही जोरदार पावसाची हजेरी आहे. त्यामुळे वेगवान शहर अशी ओळख असलेल्या मुंबईचा वेग काहीसा मंदावला आहे. आज पहाटेच मालगाडीचे डबे घसरल्याने मुंबई पुणे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. अशात आता पावसाने जोरदार हजेरी लावल्याने त्याचा परिणाम मुंबईतील लोकल सेवेवेवरही झाला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button