अभिनेत्री आरजू गोवित्रीकरची पतीविरोधात तक्रार, मद्यपान करून मारहाण केल्याचा आरोप

टेलिव्हिजन अभिनेत्री आरजू गोवित्रीकर हिनं पतीविरोधात वरळी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. मद्यपान करून मारहाण केल्याचा आरोप तिनं तक्रारीत केला आहे.
२०१० मध्ये आरजूनं व्यावसायिक सिद्धार्थ सब्बरवालसोबत प्रेमविवाह केला. मात्र आता तिनं सिद्धार्थविरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली आहे. आरजूची बहिण अदिती गोवित्रीकर हिनं आरूजूच्या घरातील काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना पुरावा म्हणून दिले आहे. ज्यात मद्यपान करून सिद्धार्थ आरजूला मारहाण करत असल्याचं दिसत आहे. सिद्धार्थ आपला मानसिक आणि शारिरीक छळ करत असल्याचं तिनं तक्रारीत म्हटलं आहे.
पतीच्या मारहाणीला कंटाळून आरजू माहेरी राहत आहे. १९ फेब्रुवारीला आरजूनं वरळी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीत पतीनं दारूच्या नशेत पहाटे मारहाण केल्याचा आरोप तिनं केला आहे. ५ मार्चला आरजूच्या बहिणीनं सिद्धार्थ विरोधात तक्रार दाखल केली आहे. सिद्धार्थनं आरजूच्या परवानगीविना लहान मुलाला नेलं त्यानं या बदल्यात पैशांची मागणी केली असल्याचंही आदिती गोवित्रीकर हिनं तक्रारीत म्हटलं आहे.





