breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईतून चांगली बातमी; कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या 9 ठिकाणी गेल्या दहा दिवसांत एकही नवा रुग्ण नाही

 राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यानं सर्वत्र चिंतेचचं वातावरण निर्माण झालं आहे…मुंबईतून एक चांगली बातमी आहे. मुंबईत कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या जी दक्षिण वॉर्डमधील ९ ठिकाणी गेल्या दहा दिवसांत एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळं ही ठिकाणं कंटेनमेंट झोनमधून वगळण्यात आले आहेत.

मुंबई महापालिकेच्या जी दक्षिण विभागात येणारा वरळी आणि प्रभादेवी हा परिसर कोरोनाच्या दृष्टीनं हॉटस्पॉट ठरला आहे. येथील अनेक भाग कंटनेमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळं साहजिकच येथील रहिवाशांवर लॉकडाऊनपेक्षाही कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र, मागील काही दिवसांत एकही पॉझिटिव्ह रुग्ण न आढळल्यानं यातील ९ ठिकाणांवरचे अतिरिक्त निर्बंध उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कंटेनमेंट झोनमधून वगळण्यात आलेल्यांमध्ये आदर्श नगर, सिद्धी प्रभा बिल्डिंग, वरळी पोलीस कॅम्प, साती आसरा, उत्कर्ष बिल्डिंग, बीडीडी चाळ, लोढा वर्ल्ड वन, आनंदछाया बिल्डिंग आणि आहुजा बिल्डिंगचा समावेश आहे. या नऊ झोनमध्ये सुमारे ४ हजार लोकांची वस्ती असून तिथं ४८ लोक पॉझिटिव्ह आढळून आले होते.

मुंबईतील मोठ्या कंटेनमेंट झोनपैकी असलेले वरळी कोळीवाडा, जिजामाता नगर आणि जनता कॉलनीत यापुढंही निर्बंध कायम राहणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button