Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
मुंबईतील वीजपुरवठा बिघाडाची चौकशी करणार – नितीन राऊत
![Kendracha Economy Energy Fields Frustrating Disappointment - Energy Minister Dr. Nitin Raut](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Nitin-Raut.jpg)
मुंबई – गेल्या काही तासांपासून मुंबई आणि लगतच्या परिसरात वीजपुरवठा ठप्प झाल्याने नागरिकांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत. या प्रकरणी वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर तांत्रिक बिघाड का झालायाची चौकशी करणार असल्याचे राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले आहे. तसेच वीजपुरवठा आणखी तासाभरात पूर्ववत होईल, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
महापरेषणच्या 400KV कळवा पडघा GSI केंद्रात सर्किट 1 देखभाल-दुरुस्ती सुरु होती. यावेळी सर्व भार सर्किट 2 वर होता. मात्र सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई आणि ठाण्यातील वीज गेल्याचेही नितीन राऊत यांनी सांगितले. यानंतर सर्किट 2च्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आल्याचे राऊत यांनी म्हटले.