Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
मुंबईतल्या खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाचा धोका कायम
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Corona-testing-1-1.jpg)
मुंबई । दोन दिवस मुंबईतली कोरोनाबाधितांचा आकडा कमी होताना दिसल्याने मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. इतक्यातच एका दिवसात तब्बल १८२ रुग्ण आढळल्याने मुंबईकरांचे पुन्हा धाबे दणाणले आहेत. सध्या तरी कोरोनापासून मुक्ती नसल्याचे नागरिकांच्या लक्षात आले आहे. मुंबईत सरकारी तसेच खासगी रुग्णालयात या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईतील मोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाचा धोका अद्याप कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.
वोक्हार्ट रूग्णालयातील २६, जसलोक रूग्णालयातील २४ नर्सेसना तर बॉम्बे हॉस्पिटलमधील १० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारसमोर हे देखील मोठं आव्हान असणार आहे. वोक्हार्ट रूग्णालयातील सर्वाधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून आतापर्यंत एकूण ७५ हून अधिक कर्मचारी वर्ग कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.