breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर कोरोनामुक्त

मुंबई – मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यांना रविवारी सेव्हन हिल्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 10 सप्टेंबर रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

महापौर किशोरी पेडणेकर यांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

गेल्या काही दिवसांपूर्वी किशोरी पेडणेकर यांच्या मोठ्या भावाचं कोरोनामुळे निधन झाल होतं. सुनिल कदम असं त्यांच्या मोठ्या भावाचं नाव होतं. त्यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महापौर किशोरी पेडणेकर यांनी भावाच्या आठवणीत ट्विटरवर एक भावनिक पोस्ट देखील शेअर केली होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button