breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी परमबीर सिंह यांची नियुक्ती

मुंबई | मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक परमबीर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली. राज्याच्या गृह विभागाकडून परमबीर सिंह यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले आहेत. मुंबईचे पोलिस आयुक्त संजय बर्वे शनिवारीच या पदावरून निवृत्त होत आहेत. त्यामुळे परमबीर सिंह आजच त्यांच्याकडून पदभार स्वीकारतील.

मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार यावरून गेल्या दोन दिवसांपासून विविध नावे पुढे येत होती. अखेर परमबीर सिंह यांच्या नावावरच गृह विभागाने शिक्कामोर्तब केले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक परमबीर सिंह यांची या पदावर वर्णी लागू शकते, असे राज्याच्या गृह मंत्रालयातील अधिकाऱ्यानी आधीच म्हटले होते.

काही दिवसांपूर्वीच परमबीर सिंह यांच्या नेतृत्त्वाखालील तपास पथकाने सिंचन घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लीनचीट दिली होती. परमबीर सिंह यांच्याकडे पोलिस दलातील प्रदीर्घ अनुभव आहे. मुंबई पोलिस दलात त्यांनी विविध पदांवर काम केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button