Breaking-newsमुंबई

मालाडमध्ये भिंत कोसळून १६ जण ठार, १३ जखमी

मुंबईतल्या मालाड भागात भिंत कोसळून १६ जण ठार झाले आहेत. तर १३ जण जखमी झाले आहेत. या ठिकाणी अग्निशमन दल आणि NDRF च्या टीमकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे. मालाडजवळच्या कुरार भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी आता ढिगारा उपसण्याचं आणि मदत करण्याचं काम सुरू आहे.

View image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Brihanmumbai Municipal Corporation (BMC): 13 people died in the retaining wall collapse of few hutments built on a hill slope in Kurar Village . Fire Brigade & NDRF had rushed to the spot.

42 people are talking about this

शनिवारीच पुण्यातल्या कोंढवा भागात भिंत कोसळून १५ मजुरांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच पुण्यात पुन्हा एकदा भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. ज्या घटनेत सहा जण ठार झाले आहेत. तर मुंबईतल्या मालाडमध्ये रात्री दोन वाजण्याच्या सुमारास भिंत कोसळून १३ जण ठार झाले आहेत. मालाड येथील कुरार भागात ही घटना घडली आहे. रात्रभर या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. रात्री दोन वाजल्यापासून या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

याबाबत फायर ब्रिगेडचे जवान सर्च ऑपरेशन करत आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो अशीही शक्यता वर्तवण्यात येते आहे. रात्रभर मुंबईत तुफान पाऊन पडतो आहे. त्याचमुळे ही भिंत कोसळली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button