माफी न मागता अभिमानाने शिक्षा भोगणाऱ्या सर्वांना भारतरत्न द्यावं; सचिन सावंत यांची मागणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Sachin-Sawant.jpg)
मुंबई | माफी न मागता अभिमानाने शिक्षा भोगणाऱ्या सर्वांना भारतरत्न द्यावं लागेल, असं ट्वीट काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलं आहे. सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध करणाऱ्यांना शिक्षा द्या, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
योगेश शुक्लासारख्या अनेकांनी काळ्यापाण्याची शिक्षा भोगून गांधीजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस चळवळीत भाग घेतल्याचं सांगत या सर्वांना भारतरत्न द्याव लागेल, अशी भूमिका सावंत यांनी ट्वीटद्वारे मांडली आहे. सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध कऱणाऱ्यांना अंदमानमध्ये सावरकरांनी शिक्षा भोगलेल्या ठिकाणी दोन दिवस पाठवायला हवं, असं मोठं वक्तव्य राऊतांनी केलंय. या मुद्द्यावरुन शिवसेना आणि राऊत पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीटद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे.