breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

माजी खासदार कॉ. रोझा देशपांडे यांचे निधन

मुंबई – माजी खासदार कॉ. रोझा देशपांडे यांचे आज दुपारी १२.३० च्या सुमारास दादर येथे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. मृत्यूसमयीत्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात विवाहीत कन्या, मुलगा, नातवंडे असा परिवार आहे.

रोझा देशपांडे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक सदस्य श्रीपाद अमृत डांगे यांच्या कन्या होत्या. आपल्या वडिलांप्रमाणे त्या सुद्धा कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या सदस्य होत्या. १९८० ते १९८७ दरम्यान त्या कम्युनिस्ट पार्टीमध्ये सक्रिय होत्या.

कॉ. रोझा देशपांडे या पाचव्या लोकसभेच्या सदस्य होत्या. सीपीआयच्या तिकिटावर उत्तर मध्य मुंबईतून त्यांनी खासदारकीची निवडणूक जिंकली होती. राजकारणाबरोबर त्या लेखन सुद्धा करायच्या. ‘एस. ए. डांगे : एक इतिहास’ हे पुस्तक सुद्धा त्यांनी लिहिले होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button