“महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्ष टीकवायचं असेल तर सगळ्यांनी समन्वय ठेवा” बैठकीत शरद पवारांचा मंत्र्यांना सल्ला…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Untitled-125.png)
मुंबई | महाईन्यूज |
शरद पवार यांची 16 मंत्र्यांसोबतची बैठक अखेर पार पडली आहे…या बैठकीकडे सर्वांच लक्ष लागून राहिल होत…या बैठकीत नेमके कोणते निर्णय घेतले जाणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती…महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्ष टीकवायचं असेल तर सगळ्यांनी समन्वय ठेवा. सरकार आणि पक्षात मतभेद निर्माण होतील, अशी वक्तव्य टाळा, असा सल्ला शरद पवारांनी आपल्या मंत्र्यांना दिला. कोणत्याही मंत्र्याने एखादा निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांशी समन्वय साधा, असंही शरद पवारांनी बैठकीत सांगितलं.
महाविकास आघाडी सरकारच्या खातेवाटपानंतर शरद पवारांनी आपल्या मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेतला. प्रत्येक मंत्र्यांने आपण काय काम केलं, याचा लेखाजोखा शरद पवारांसमोर मांडला. महाविकास आघाडी सरकार आल्यापासून तिन्ही पक्षातील नेत्यांच्या वक्तव्यांमुळे, काही निर्णयांमुळे प्रसारमाध्यमात वारंवार महाविकास आघाडीत मतभेद असल्याच्या बातम्या आल्या. भाजपकडूनही ऑपरेशन लोटसची चर्चा सुरू होती. त्यामुळे आपलं सरकार टीकवायचं असेल तर सगळ्यांनी समन्वय ठेवणे गरजेचं आहे. पक्षांमध्ये मतभेद निर्माण होतील, अशी वक्तव्ये टाळली पाहिजेत, असा सल्ला शरद पवारांनी दिला.