breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मराठा आरक्षण देताना अन्य समाजावर अन्याय नको – छगन भुजबळ

मुंबई –  मराठा आरक्षणाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत, सर्वपक्षीय सदस्यांची बैठक विधानभवन येथे घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार व पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ उपस्थित होते. यावेळी मराठा आरक्षणाविषयी आपलं मत माडंताना छगन भुजबळ म्हणाले, ”मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. एससीएसटी आणि ओबीसी या घटकांवर अन्याय होऊ न देता हे मराठा आरक्षण देण्यात यावे”. ‘यासाठी कायदा दुरुस्ती आवश्यक असल्यास ती ताबडतोब करावी आणि याकरता घटनेत तशी तरतूदही करून घेण्यात यावी’, अशी मागणी भुजबळ यांनी यावेळी केली.

‘दोन तृतीयांश बहुमत होण्यासाठी आदरणीय शरद पवार स्वतः सहकार्य करायला तयार आहेत. त्यामुळे आंदोलनादरम्यान आत्महत्या, हिंसाचार यापासून सर्वांनी दूर रहावे’, असे आवाहन भुजबळ यांनी बैठकीदरम्यान केले. याशिवाय ‘मागासवर्ग आयोगाचा निकाल आल्यानंतर त्यात कायद्याची त्रुटी असेल आणि आवश्यक बदल गरजेचे असतील, तर ताबडतोब विशेष अधिवेशन बोलवण्यात यावे. आम्ही सर्व त्यासाठी सहकार्य करु’, अशी ग्वाही देखील भुजबळ यांनी दिली.

”राज्यातील ७२ हजार रिक्त पदांवर होत असलेल्या नोकर भरतीमध्ये मराठा समाजाच्या जागा बाजूला काढून एससी, एसटी, ओबीसी सहित सर्व समाजाची नोकर भरती करावी. जेणेकरून इतर समाजावर अन्याय होणार नाही”, असं वक्तव्य भुजबळ यांनी केलं. ‘ही नोकर भरती राज्यातील टाटा सोशल सायन्स सारख्या नि:पक्षपाती यंत्रणेकडून करावी’, असंही ते म्हणाले. तसंच ‘सध्या मराठा समाजाच्या आंदोलकांचे मोठ्याप्रमाणावर जे अटक सत्र सुरु आहे, ते त्वरीत नाहीतर आंदोलन अधिक उग्र होईल’, असंही भुजबळ म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button