breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मनसे आमदार शरद सोनावणेंचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे  एकमेव आमदार शरद सोनावणे यांनी आज (सोमवार)  मनसेला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार शरद सोनावणे यांच्या हातावर शिवबंधन बांधले आहे.  सोनावणे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

मनसेच्या सहा नगरसेवकांनी मनसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता त्यापाठोपाठ एकमेव आमदार शरद सोनावणे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर  राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, जुन्नर तालुक्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शरद सोनावणे यांच्या पक्षप्रवेशावर तीव्र नाराजी व्यकत् केली होती.  आमचे मत लक्षात न घेता  आमदार सोनावणे यांना उमेदवारी दिली, तर तालुक्यातील सर्व पदाधिकारी आपापल्या पदाचा सामूहिक राजीनामा देतील, असा इशारा त्यांनी शिवसेना नेतृत्वाला दिला होता.

मनसेचे ग्रामीण भागात संघटनात्मक जाळे नसल्यामुळे आपण शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे शरद सोनावणे यांनी म्हटले होते. आता सोनावणे यांनी शिवसेनेचा भगवा हातात घेतल्याने मनसेला हा मोठा धक्काच आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button