breaking-newsमुंबई

मंत्रालयात पाच दिवसांचा आठवडा आणि कारागृहातील कर्मचाऱ्यांना सातही दिवस काम

गेल्याच आठवड्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू केला. पण राज्यातील कारागृहात कार्यरत असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना आठवड्यातून एक दिवसाची साप्ताहिक सुटी मिळणेही अवघड असल्याचे वास्तव समोर आले आहे. 

कारागृहातील कैद्यांची मोठी संख्या आणि अपुरे कर्मचारी यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांना आठवड्यातील सातही दिवस काम करावे लागते आहे. सध्या महाराष्ट्रातील कारागृहात कैद्यांच्या संख्येत क्षमतेपेक्षा चारपट जास्त कैदी शिक्षा भोगत आहेत. त्याचाही परिणाम कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुटीवर झाला आहे.

दरम्यान, राज्याचे कारागृह विभागाचे पोलिस महासंचालक दीपक पांडे यांनी गेल्याच महिन्याच्या शेवटी एक पत्रक काढले असून, त्यामध्ये कारागृहातील पोलिस कर्मचाऱ्यांना आठवड्यातून एक दिवस साप्ताहिक सुटी देणे बंधनकारक केले आहे. जर साप्ताहिक सुटी देता येत नसेल तर त्यासाठी पूर्वपरवानगी घेणेही बंधनकारक करण्यात आले आहे. याच पत्रकामध्ये कारागृहातील कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुटी मिळत नसल्याचे म्हटले आहे. सुटी मिळत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबियांना वेळ देता येत नसल्याचे म्हटले आहे. २८ फेब्रुवारीला हे पत्रक जारी करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button