breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
भुवनेश्वर एक्स्प्रेसचे आठ डबे रूळावरून घसरले, २० प्रवासी जखमी
मुंबई | महाईन्यूज
भुवनेश्वर लोकमान्य टिळक टर्मिनन्स एक्स्प्रेसचे जवळपास आठ डबे रूळावरून घसरलेले आहेत. सकाळी सातच्या सुमारास ही घटना कटक येथील निरगुंडी रेल्वेस्थानकाजवळ घडली आहे. यामध्ये २० प्रवासी जखमी झाले आहेत, तर पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे.
दाट धुक्यांमुळे ही रेल्वे अन्य एका मालगाडीला धडकली असल्याने हा दुर्घटना घडली असल्याचे सांगण्यात आलेले आहे. या दुर्घटनेबाबत माहिती मिळाताच घटनास्थळी मदतकार्य सुरू झाले आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयांमध्ये दाखल केले जात आहे.