breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

भीमा कोरेगाव प्रकरण – राष्ट्रीय तपास यंत्रणेने ८ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले

मुंबई – भीमा कोरेगाव प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) ८ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. आनंद तेलतुंबडे, गौतम नवलाखा, हॅनी बाबू, सागर गोरखे, रमेश गैचोर, ज्योती जगताप, स्टॅन स्वामी आणि मिलिंद तेलतुंबडे यांच्या विरोधात चार्जशीट दाखल करण्यात आलं आहे. भीमा कोरेगावमध्ये २०१८ मध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी आजच राष्ट्रीय तपास यंत्रणेने स्टॅन स्वामी यांना झारखंडमध्ये अटक केली. त्यापाठोपाठ आज आठ जणांविरोधात FIR दाखल केला आहे.

जानेवारी २०१८ला पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव मध्ये हिंसाचार उसळला होता. त्यापूर्वी एक दिवस पुण्यातल्या शनिवार वाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनात या हिंसेचं मूळ आहे असा पुणे पोलिसांचा आरोप आहे. ज्याभोवती प्रश्नांचं काहूर उठलं आहे. पुणे पोलिसांनी गौतम नवलाखा, सुधा भारतद्वाज, वरवरा राव, अरुण फरेरा आणि व्हर्नोन गोन्साल्विस यांना अटक केली आहे. त्यानंतर इतरांनाही अटक करण्यात आली. आज या प्रकरणी NIA ने आज आठ जणांना अटक केली.

इतर संघटनांना पुढे करुन एल्गार परिषद ही केवळ चेहरा होती त्यामागून हे माओवादी कार्यकर्ते त्यांच्या विचारसरणीचा प्रचार करत होते असाही आरोप आहे. एल्गार परिषदेत सुधीर ढवळे आणि कबीर कलामांचच्या इतर सदस्यांनी आक्षेपार्ह गाणी सादर केली होती. समाजात प्रक्षोभक आणि चिथावणीखोर वक्तव्यं करुन पत्रकं आणि पुस्तिका वितरित केल्या असंही पुणे पोलिसांचे म्हणणे आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button