breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
भाजपचे अतुल भातखळकर यांनाही धमकीचा फोन
![BJP's Atul Bhatkhalkar also received a threatening phone call](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/atul_bhatkhalkar.jpg)
मुंबई – भाजपच्या चित्रा वाघ यांना धमकीचा फोन आला होता. आता त्यानंतर आणखी एका नेत्याला धमकीचा फोन आला आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी आपल्यालाही धमकीचे फोन आल्याची तक्रार केली आहे. समता नगर पोलिस चौकीत ही तक्रार केली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. अशा प्रकारच्या धमक्यांना आम्ही घाबरणारे नाही, असं आव्हानच भातखळकर यांनी धमकीचे फोन करणाऱ्यांना दिलं आहे.
पूजा चव्हाण प्रकरणात भाजप नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचं नाव या प्रकरणात आल्यामुळे, या प्रकरणाची सखोल चौकशी करुन त्यांच्यावर कारवाईची मागणी भाजप नेत्यांकडून केली जात आहे. त्यानंतर भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ आणि आता अतुल भातखळकर यांनाही धमकीचे फोन आल्यामुळे हे प्रकरण कुठल्या थराला जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.