breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
बीडमध्ये बालगृहात जेवणातून 10 मुलांना विषबाधा
बीड – बालगृहातील 10 मुलांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना गुरूवारी दुपारी उघडकीस आली. या मुलांवर बीड जिल्हा रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. मुलाची प्रकृती स्थीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
बीड जिल्ह्यातील शिरूर येथील योगेश्वरी बालगृहातील 8 ते 10 मुलांना विषबाधा झाल्याने खळबळ उडली. बाल सुधारगृह प्रशासनाला विचारले असता जेवणातून नाही तर मुलांनी घरून आणलेला चिवडा खाल्याने पोटात दुखू लागल्यामुळे नांदुर घाट येथील शासकीय रुग्णालयात उपचार केले. शाळा सुरू झाल्याने आठ दिवसांपूर्वीच शाळेच आल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर मुलांना बीड जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सर्व मुलांचा प्रकृती स्थीर असल्याचे बालगृहाचे संचालक डॉ. तांबडे यांनी सांगितले.