breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

बापरे! मुंबईत कोरोना रुग्णांमध्ये दिसून येत आहे एक वेगळचं लक्षण…

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या ही महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रमाणात आहे… मात्र आता मुंबईकरांच्या चिंतेत आणखी एक वाढ झाली आहे. कारण मुबंईतील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये एक वेगळंच लक्षण दिसून येऊ लागलं आहे..त्यामुळे डॉक्टरही हैरान झाले आहेत. मधुमेह नसलेल्या धडधाकट करोना रुग्णांच्या शरीरात अचानक शुगर लेव्हल अनियंत्रितपणे वाढत असल्याचं निदर्शनास आलं आहे…काही वेळा तर रुग्णांसाठी हे घातकही ठरत आहे. करोना रुग्णांमध्ये हा वेगळाच प्रकार आढळून येत असल्यानं मुंबईतील सरकारी आणि खासगी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर चिंतेत आले आहे.

मधुमेह नसलेल्या कोरोना रुग्णांची शुगर लेव्हल अनियंत्रितपणे का वाढत आहे? याचा केईएमच्या डॉक्टरांचं एक पथक अभ्यास करत असून लवकरच त्याचं उत्तर मिळेल असं सांगितलं जात आहे. भारतात करोना व्हायरसचा संसर्ग पसरण्याआधीपासून मधुमेह हा आजार होता. भारतातील सुमारे ७.७ कोटी लोकांना मधुमेह होता. चीननंतर सर्वाधिक मधुमेही रुग्ण असलेला भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. चीननंतर भारतात सहा लोकांमागे एकाला मधुमेह असल्याचं तज्ज्ञ सांगतात. चिंताजनक बाब म्हणजे २०४५ पर्यंत भारतात १३.४ कोटी मधुमेही रुग्ण वाढण्याची शक्यता इंटरनॅशनल डायबेटिस फेडरेशनने वर्तवली आहे.

६० वर्षांवरील करोना रुग्णांचं मृत्यूंच प्रमाण अधिक आहे. त्यापेक्षा कमी वयाचे रुग्ण बरे होत आहेत. मात्र सध्या रुग्णालयात २५ ते ५५ वयोगटातील करोना रुग्ण येत असून या रुग्णांना मधुमेह नसतानाही त्यांची शुगर लेव्हल प्रचंड प्रमाणात वाढताना दिसत आहे, असं केईएमचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितलं. गेल्या दोन महिन्यांपासून मधुमेह नसलेल्या अनेक रुग्णांनामध्ये साखरचे प्रमाण अनियंत्रितपणे वाढलेलं दिसत आहे. हा प्रकार का वाढला आहे, त्यामागची कारणं शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. मात्र, हा प्रकार अलिकडेच सुरू झाल्याचं फोर्टिस हॉस्पिटलचे डॉ. राहुल पंडित यांनी सांगितलं.

ताप किंवा व्हायरल इन्फेक्शन झाल्यास रक्तातील साखरेचं प्रमाण अचानक वाढू शकतं, असंही डॉक्टरांचं म्हणणं आहे. गेल्या महिन्यात एका ३५ वर्षीय रुग्णाला अॅडमिट करण्यात आले होते. त्यावेळी त्याची शुगर लेव्हल ३३० मिलिग्रॅम होती. त्याला ताप आणि खोकला होता. या रुग्णाला करोना झाल्याचं निदान झाल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले. तेव्हा त्याच्या रक्तातील साखरेचं प्रमाण ५०० मिलिग्रॅमवर पोहोचली. त्याने रोज दहा दिवस १५० ते २०० युनिट्स इन्श्युलिन घेतल्यानंतर त्याच्या रक्तातील साखरेचं प्रमाण लेव्हलवर आलं, असं डॉ. पूजा यांनी सांगितलं. दरम्यान, कोरोना रुग्णांच्या शरीरातील शुगर लेव्हल अचानक वाढू लागल्याने डॉक्टरांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button