breaking-newsमुंबई

फोर्टमधील बाहुबली इमारतीच्या आगीत तरुण भाजून जखमी

मुंबई – फोर्टमधील सौराष्ट्र हॉटेलजवळच्या पटेल रोडवरील ४ मजली बाहुबली या इमारतीला बुधवारी रात्री ७.३०च्या सुमारास आग लागली. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ती शर्थीच्या प्रयत्नांनंतर आटोक्यात आणली. मात्र या आगीत दीपक दिलदार (२२) हा तरुण जखमी झाला असून त्याला बॉम्बे रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

फोर्टमधील बाहुबली इमारतीला काल रात्री ७.३०च्या सुमारास आग लागली. या आगीत दीपक दिलदार हा तरुण ३५ टक्के भाजून जखमी झाला आहे. त्याला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. ही आग नियंत्रणात आली आहे. परंतु या आगीचे नेमके कारण समजलेले नाही, असे अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button