फेक न्यूज रोखण्यासाठी व्हाट्सअॅपकडून टीम
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/0whattusup_image_1.gif)
नवी दिल्ली- फेसबुकच्या मालकीचे असलेल्या व्हाट्सअॅप या सोशल नेटवर्कींग साईटने चुकीच्या बातम्या रोखण्यासाठी जगभरात 20 टीमची स्थापना केली आहे. यामध्ये काही भारतीयांचा समावेशही करण्यात आला आहे. व्हाट्सअपवरून फिरणाऱ्या मेसेजमुळे अनेक दुर्घटना घडत आहेत. या रोखण्यासाठी व्हाट्सअपने हा निर्णय घेतला आहे.
आतापर्यंत जगभराच व्हाट्सअॅपच्या चुकीच्या मेसेजने 30 पेक्षा जास्त लोकांचा बळी घेतला आहे. अशा प्रकारच्या सर्व घटना थांबवण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी ही टीम काम करणार असल्याचे व्हाट्सअॅपकडून सांगण्यात आले आहे.
सध्या व्हाट्सअॅपच्या माध्यमातून अनेक फेक बातम्या, भावना भडकवणारे मेसेज पसरविले जातात आणि त्यामुळे दुर्घटना घडतात. अशा प्रकारच्या सर्व चुकीचे मेसेज व बाकी गोष्टींवर व्हाट्सअॅप या मंडळांच्या माध्यमातून आता लक्ष ठेवणार आहे.