पोलीस भरती म्हणजे मराठा समाजाला चिथावणी देण्यासारखं; संभाजीराजेंचा संताप
!['सारथी' संस्थेला शरद पवारांनी बळ द्यावे - खासदार संभाजी राजे](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/sambhajiraje-.jpg)
मुंबई | राज्यात पोलीस शिपाई पदासाठी मोठी भरती होणार आहे. तब्बल 12 हजार 528 पदांसाठी पोलीस भरती करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. परंतु या निर्णयावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “तुम्हाला मराठा समाजाला चिथावणी द्यायची आहे का?” असा सवाल विचारत मराठा आरक्षणावर तोडगा निघेपर्यंत पोलीस भरती घेऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सोबतच भाजप आमदार नितेश राणे आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाचे नेते आबासाहेब पाटील यांनीही पोलीस भरती करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध केला आहे. हा निर्णय ऐकून मी दु:खी झालो. सध्या पोलीस भरती करण्याचं वातावरण नाही. ५८ मोर्चे निघाले बहुजन समाने सपोर्ट केल्यानेच ते यशस्वी झाले. आज मराठा समाज दुखी आहे. आपल्याला आरक्षण पुन्हा कसं मिळणार याकडे लक्ष केंद्रीत करायला हवं.
नोकरभरती पुढच्या टप्प्यात करा ना, आजच का घ्यायचीय? तुम्हाला मराठा समाजाला चिथावणी द्यायचीय का? मराठा आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत पोलीस भरती करु नका. बाकीच्या समाजाचे लोक समजून घेतील. समाजातील लोकांनी एकत्र राहणं गरजेचं आहे. आता पोलीस भरती घेणं म्हणजे मराठा समाजाला चिथावणी देण्यासारखं आहे.