पेच कायम! राज्यपालांचा वेळ वाढवून देण्यास शिवसेनेला नकार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/rajypal_meet.jpg)
मुंबई ।
राज्यात मागील 15 दिवसांपासून वेगवान राजकिय घडामोडी घडत आहेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनाकडे रवाना झाले होते. मात्र राष्ट्रवादी, व कॉंग्रेसकडून पाठीब्याची पत्रे न मिळ्याल्याने राज्यातील पेच कायम आहे. शिवसेनेने सत्तास्थापन करण्यासाठी राज्यपालांकडे 24 तासांचा अवधी मागीतला होता. मात्र राज्यपालांनी त्यास नकार दिल्याने महाराष्ट्राची वाटचाल पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवटीकडे सुरू झाल्याचे बोलले जात आहे.
तत्पूर्वी, शिवसेनेला राज्यपालांनी सत्तास्थापनेबाबत संध्याकाळी 7.30 पर्यंत निर्णय कळविण्यास सांगितले आहे. मात्र, शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत कॉग्रेसची भुमीका समोर आली नसल्याने शिवसेना बुचकळ्यात पडली असल्याचे चित्र निर्माण झाले होते. शिवसेनेला पाठींबा देण्यासंदर्भात कॉंग्रेसमध्ये मतभेद होते. ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व संजय निरूपम यांचा शिवसेनेला पाठींबा देण्यास विरोध असल्याचे समजते तर राज्यातील इतर नेते शिवसेनेला पाठींबा देण्यासंदर्भात कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची मनधरणी करत होते. शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात कॉंग्रेसची भूमीका समोर आली तरच सत्तास्थापनेबाबत शिवसेना पुढील निर्णय घेऊ शकणार आहे.