breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

पृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रीय पातळीवर संधी

  • मध्य प्रदेशमध्ये जाहीरनामा अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष

मुंबई | महाईन्यूज

राज्याच्या काँग्रेसच्या राजकारणात काहीसे मागे पडलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पक्षाने अखेर राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी दिली आहे. पक्षाची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशात जाहीरनामा अंमलबजावणी समितीच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली.काँग्रेस पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये जाहीरनाम्याची योग्यपणे अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने पक्षाने जाहीरनामा अंमलबजावणी समित्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. मध्य प्रदेशातील चारसदस्यीय समितीच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. याशिवाय गुजरातमधील काँग्रेस नेते अर्जुन मोधवाडिया, मुख्यमंत्री कमलनाथ आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्षांचा समावेश आहे.

राज्यात शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करण्याकरिता पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला होता. काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांचा विरोध असतानाही दोन्ही चव्हाणांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता शिवसेनेबरोबर हातमिळवणी करणे कसे आवश्यक आहे हे पटवून दिले होते. काँग्रेसने शिवसेनेबरोबर हातमिळवणी केली व सरकार स्थापन झाले. अशोक चव्हाण यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली. पृथ्वीराज चव्हाण यांना मंत्रिपद तर नाहीच, पण विधानसभा अध्यक्षपद देण्यास विरोध झाला. यामुळे चव्हाण हे काहीसे नाराज होते. मध्य प्रदेशमध्ये जाहीरनामा अंमलबजावणी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करून काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी चव्हाण यांच्या अनुभवाचा फायदा करून घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button