breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

पालघर पुन्हा हादरलं; डहाणू आणि तलासरीला बसले भूकंपाचे 8 धक्के

मुंबई |महाईन्यूज|

पालघर जिल्ह्यात भूकंपाची मालिका थांबण्याचं नाव घेत नाही आहे. पालघर जिल्हा मंगळवारी भूकंपाच्या धक्क्यानं हादरला आहे. डहाणू आणि तलासरी या भागांत दोन दिवसांत जवळपास 13 भूकंपाचे धक्के बसले आहेत. भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, तलासरी, डहाणूत भूकंपाचे सत्र सुरूच आहे. सोमवारी, मंगळवारी भुकंपाचे धक्के जाणवल्याने पालघर जिल्ह्यातील बहुतांश गावे पुन्हा भयभीत झाले आहेत. 9 मार्च रोजी पहाटे 4 वाजता 2.0 रिश्टरचा, त्यानंतर लगेच 05 वाजून 18 मिनिटांला 2.3 रिश्टरचा धक्का बसला. रात्री 8 वाजून 45 मिनिटांला 2.4 रिश्टरचा तर 8 वाजून 47 मिनिटांला 2 रिश्टरचा धक्का बसला. आज (10 मार्च) पहाटेही चार धक्के बसले. मध्यरात्री 1 वाजून 24 मिनिटांला 2.8 रिश्टरचा, पहाटे 5 वाजून 47 वाजता 2.7 रिश्टरचा, सकाळी 6 वाजून 21 मिनिटांला 2.0 रिश्टरचा तर सकाळी 9 वाजून 48 मिनिटांला 1.9 रिश्टरचा धक्का बसला.

सलग दोन दिवस भूकंपाचे लहान-मोठे आठ हादरे बसल्याने नागरिकांत भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button