breaking-newsमुंबई

पालघरमध्ये मध्यरात्री भूकंपाचे धक्के

पालघर – गेल्या काही दिवसांपासून पालघरमध्ये सतत भूकंप होत आहेत. त्यात मंगळवारी मध्यरात्री १ वाजून १९ मिनिटांनी भूकंप झाला. त्याची तीव्रता २.८ रिश्टर स्केल एवढी होती. गाढ झोपेत असताना झालेल्या या भूकंपामुळे नागरिक घाबरले आणि घराबाहेर पळत सुटले. त्यामुळे तेथे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. भूकंपामुळे घाबरलेल्या पालघरकरांनी अख्खी रात्र अक्षरशः जागून काढली.

मुंबईजवळच्या पालघरमध्ये गेल्या काही दिवसांपासून रात्री-अपरात्री भूकंपाचे हादरे बसत आहेत. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. असे असताना काल मध्यरात्री भूकंप झाला. त्यामुळे घरातील भांडी पडल्याने घाबरलेले नागरिक घराबाहेर पळाले. त्यानंतर त्यांनी पुन्हा संपूर्ण रात्र जागून काढली. आठवड्यातून दुसऱ्यांदा भूकंपाचे हादरे जाणवल्याने येथील रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भूकंपामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button