पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टिकेनंतर राष्ट्रवादीकडून सडकून प्रत्युत्तर
![Pune Municipal Corporation: BJP's Shetty and Congress's Shirole joined NCP](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/ncp-1570623821.jpg)
मुंबई | प्रतिनिधी
देशात शेतकरी आंदोलन पेटले आहे. त्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी केंद्र सरकार त्या प्रश्नापासून पळ काढ़त आहे. ज्यांनी कधी कोणत्या स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग घेतला नाही त्यांना आंदोलनकर्त्यांचे दुःख समजनार नाही. केंद्र सरकारने प्रश्न टाळून शेतकऱ्यांना रस्त्यावर आणण्याचे काम करत असल्याची टीका गृहनिर्माण राज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंतप्रधानांनी राज्यसभेत राष्ट्रपती अभिभाषणावरील चर्चेवर उत्तर देताना खा. शरद पवार यांचा उल्लेख करून टीप्पणी केली. यावर पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सडकून प्रत्युत्तर दिले आहे.
शेतकऱ्यांची ७० दिवस अडवणूक, १०० हून अधिक लोकांचा जीव गेला, पंतप्रधानजी, हे लोकतंत्र आहे का? असा सवाल राष्ट्रवादी कोंग्रेसने उपस्थित केला आहे. भारतीय लोकशाही कशी चांगली आहे व आणीबाणीच्यावेळी लोकशाहीची कशी गळचेपी झाली होती, यावर विवेचन देताना सरकारने शेतकऱ्यांविषयी अवलंबलेली भूमिका पंतप्रधान सोयिस्करपणे विसरलेत का? असाही सवाल राष्ट्रवादीकडून करण्यात आला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंतप्रधानांनी राज्यसभेत राष्ट्रपती अभिभाषणावरील चर्चेवर उत्तर देताना आदरणीय खा. @PawarSpeaks साहेबांचा उल्लेख करून टीप्पणी केली. यावर पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री ना. @Awhadspeaks यांनी प्रत्युत्तर दिले आहे. pic.twitter.com/UwP3L12bIh
— NCP (@NCPspeaks) February 8, 2021
मंत्री आव्हाड म्हणाले की…..
शहीद भगतसिंग यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिले. देशाला आझाद करण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. ज्यांनी कोणत्याही लढ्यात भाग घेतला नाही. त्यांना हा इतिहास माहीत नाही. देशातील विविध वस्तुंच्या किंमती कमी जास्त होत असताना त्याची जबाबदारी सरकारने घेणे गरजेचे आहे. मात्र भाजप सरकार त्यापासून पळ काढत असल्याची टीका मंत्री आव्हाड यांनी केली.