breaking-newsमुंबई
नाशिकमध्ये हॉलीडे एक्सप्रेसचे दोन टब्बे घसरल्याने प्रवाशांचे हाल
नाशिक – नाशिकजवळील नांदगाव स्थानकाजवळ रविवारी (दि. 2) सकाळी हॉलिडे एक्स्प्रेसचे दोन डबे रुळांवरून घसरले. ही एक्सप्रेस बरेली येथून मुंबईला येत होती, अशी माहिती आहे. परिणामी या अपघातामुळे मुंबईकडे येणारी लांबपल्ल्याची वाहतूक ठप्प झाली आहे.
रेल्वेच्या चाकाला तडे गेल्याने चाक तुटले होते. यामुळे डबे घसरल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे मुंबईकडे येणाऱ्या अनेक एक्स्प्रेसचा खोळंबा झाला असून वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान या अपघातात कोणी जखमी झाल्याचे अद्याप वृत्त नाही. वाहतूक सुरळीत होण्यासाठी संध्याकाळपर्यंतचा वेळ लागू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.