नालासोपारा येथील भीषण आगीत 25 दुकाने जळून खाक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/nalasopara-fire-Copy-1.jpg)
मुंबई – नालासोपाऱ्यात भीषण आग लागल्याची घटना घडली असून यामध्ये जवळपास 20 ते 25 दुकानं जळून खाक झाली आहेत. यातील बहुतांश दुकाने ही कपड्याची आणि इलेक्ट्रॉनिक्सची आहेत. नालासोपारा पूर्वेकडील जाधव मार्केटमध्ये आज(दि.2) पहाटे ही भीषण आग लागल्याचं समजतंय. दरम्यान, अग्नीशमन दलाच्या जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.
Maharashtra: Fire breaks out in Jadhav market in Nala Sopara,Palghar. Fire tenders at the spot pic.twitter.com/7i00uLZU6H
— ANI (@ANI) June 2, 2019
प्राथमिक माहितीनुसार, नालासोपारा पूर्वेकडील जाधव मार्केटमध्ये आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. आग लागताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं होतं, मात्र ही आग काही क्षणांमध्येच फोफावली. बाजूला असलेल्या निवासी इमारतींमध्येही धुराचे लोट पसरले होते. आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.